करोना संकटामुळे लॉकडाऊन जाहीर झाल्यानंतर सुरुवातीचे दिवस घरकामात, स्वयंपाकात, विविध छंद जोपासण्यात किंवा नवीन काह ी शिकण्यात गेले पण शेवटी आता प्रत्येकालाच आपल्या कामाची ओढ लागली. प्रत्येकजण आपल्या कामाला -रुटीनला मिस करु लागलं आहे.
सामान्यांपासून सेलिब्रिटींपर्यंत सर्वच जण घरी आहेत व ते या क्वारंटाईन रुटीनला अगदी कंटाळले आहेत, त्यामुळे प्रत्येकाला आपल्या कामाची आठवण येऊ लागली आहे. मराठी सिनेसृष्टीतली अप्सरा सोनाली कुलकर्णीनेसुध्दा करोनापूर्वीच्या जगाच्या आठवणी कवितेतून मांडल्या आहेत. तेसुध्दा अगदी जबरदस्त फिल्मी स्टाईलने . तुम्हालाही सोनालीची ही कविता प्रचंड आवडेल यात शंका नाही.
सोनालीच्या या प्रेरणादायी कवितेमुळे प्रत्येकामध्येच एक सकारात्मक उर्जा येईल व त्यामुळे कामाचा नवा उत्साह संचारेल.