सध्याच्या लॉकडाउनच्या काळात मानसीक आरोग्य जपणही महत्त्वाचं आहे. सध्या घरात बसलेले बहुतांश लोक या मिळालेल्या वेळेत निरनिराळ्या गोष्टी करत आहेत. तर कुणी त्यांचे छंद जोपासत आहेत.
अभिनेत्री प्रार्थना बेहेरेही सध्या तिचा छंद जोपासत आहे. प्रार्थनाही सध्या घरात आहे. नुकतच वडोदरावरून पतिसाठी मुंबईत परतलेली प्रार्थना पति अभिषेकसोबत क्वारंटाईन टाईम घालवतेय. प्रार्थनाला चित्रकलेची आवड आहे. आणि म्हणूनच या दरम्यान ती तिचा हा छंदही जोपासत आहे. नुकताच तिने चित्र काढतानाचा तिचा एक फोटो पोस्ट केला आहे. या फोटोच्या कॅप्शनमध्ये प्रार्थना म्हणते की, “मानसीक आरोग्यही महत्त्वाचं आहे. आणि कला ही एकमेव मार्ग आहे ज्यातून आपण घरातून बाहेर न पडताही पळून जाऊ शकतो.”
कलेतून काहीही शक्य होतं असं म्हणत ही सकारात्मक पोस्ट प्रार्थनाने केली आहे. इतके दिवस घरात बसून मानसीक आरोग्य स्थिर राहण्यासाठी कला जोपासणं हा उत्तम मार्ग असल्याचं प्रार्थना म्हणतेय. शिवाय प्रार्थनाला चित्रकलेचीही आवड असल्याने ती तिची ही कला सध्या या लॉकडाउनमध्ये जोपासतेय.