By  
on  

 अमेय वाघने किचन एक्सपर्ट्सना विचारला हा प्रश्न 

लॉकडाउनच्या काळात अमेय वाघ स्वयंपाक घरातही पत्निला मदत करू पाहतोय. त्याच्या सोशल मिडीयावरील व्हिडीओ पाहिले की लक्षात येईल की अमेय सध्या घरात बसून काय काय करतोय ते. नुकतच अमेयने एक युट्यूब चॅनलही सुरु केलं असून या चॅनलवर तो विविध व्हिडीओ पोस्ट करतो.

मात्र नुकतच अमेयने स्वयंपाकात एक्सपर्ट  असणाऱ्या लोकांना विचारला आहे एक प्रश्न. हा प्रश्न कुकिंग संदर्भातला आहे. अमेय बऱ्याच दिवसांपासून गोल पोळ्या लाटण्याचा प्रयत्न करतोय. मात्र गेली 20 दिवस त्याला अपयश येत होतं. मग शेवटी सोशल मिडीयावर पोस्ट करून अमेयने गोल पोळी लाटायला किती दिवस लागतात असाच प्रश्न विचारला. या प्रश्नावर नेटकऱ्यांनीही मजेशीर उत्तरं दिली आहे. अमेयने लाटलेल्या पोळीचा फोटोही पोस्ट केला आहे. 

अमेय सध्या सोशल मिडीयावर विविध मनोरंजक व्हिडीओ पोस्ट करताना दिसतोय. 

 

Author

Recommended

PeepingMoon Exclusive