पााहा Video : मराठी रंगभूमीवरील 38 रंगकर्मींनी व्यक्त केलेली ही 'कृतज्ञता'
आज संपूर्ण जगाला करोना विषाणूने सळो की पळो करुन सोडलंय. या रोगामुळे जगभरात मरण पावलेल्यांची संख्या काही हजारांच्या घरात आहे. आपल्या देशातही करोनाचे रुग्ण आता झपाट्याने वाढू लागले आहेत. मुंबईत तर ही संख्या लक्षणीय वाढतेय. देशभर १४ एप्रिलपर्यंत लॉकडाऊन काळ जाहीर करण्यात आला आहे. प्रत्येकाला घरीच राहून सुरक्षित राहायचं आहे.
या करोना संकटात सरकारी यंत्रणांसोबतच नागरिकांचे प्राण वाचवण्यासाठी झटणारे आरोग्य कर्मचारी, जनजीवन सुरळीत ठेवण्यासाठी राबणारे पोलीस आणि आपल्या पर्यंत जीवनावश्यक गोष्टी पोहोचवणाऱ्या व्यक्ती नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी झटतायत. ते त्यांच्या कुटुंबाला सोडून आपली काळजी घेतायत. त्याचं मनोधैर्य वाढवण्याची एक सुजाण नागरिक म्हणून प्रत्येकाची जबाबदारी आहे. या सर्वांना कृतज्ञता म्हणून मराठी रंगभूमीवरील 38 रंगकर्मींनी 'कृतज्ञता' गाणं समर्पित केलं आहे.