By  
on  

 अभिनेता वैभव मांगले यांची ही कला तुम्हाला माहिती आहे का ?

या लॉकडाउनमध्ये बहुतांश लोकं त्याची कला, छंद, आवडी यांच्या जवळ पोहोचले आहेत. आपल्या कलागुणांना वाव देण्यासाठी मिळालेला हा वेळ समजून या वेळेचा सदुपयोग करत आहेत. 

अभिनेता वैभव मांगलेही सध्या घरी आहेत आणि या वेळेत ते त्यांचा छंद जोपासत आहेत. हा छंद आहे चित्रांचा, पेंटिंगचा. वैभव मांगले त्यांचा हा छंद सध्या जोपासत आहेत. मात्र हे चित्र एखाद्या कागदावर न रेखाटता न रंगवता विविध पडीक वस्तूंवर त्यांनी ही चित्रे काढली आहेत. वैभव मांगले यांनी चक्क दगडांवर सुंदर चित्रे रंगवली आहेत. शिवाय जुने लाकडी पाट, फळ्या यांच्यावरही त्यांनी अप्रतीम चित्रे काढली आहेत. अभिनयासोबतच वैभव यांचं चित्रकलेवर असलेलं हे प्रेम या निमित्ताने पाहायला मिळतय. 
 

Author

Recommended

PeepingMoon Exclusive