या लॉकडाउनमध्ये बरीच लोकं बऱ्याच गोष्टी मिस करत असतील. मात्र लॉकडाउननंतर आता काय काय करायचं याची जवळपास यादीच काहींनी बनवली असेल. यात बऱ्याच गोष्टींची आठवण सगळ्यांना येत असेल.
अभिनेत्री सायली संजीवही एका गोष्टीला सध्या मिस करतेय. तिला समुद्र किनाऱ्यावर जायची इच्छा होत आहे. नुकताच तिने तिचा एक समुद्र किनाऱ्यावरील एक फोटो शेयर केला आहे. आणि या फोटोच्या कॅप्शनमध्ये सायली लिहीते की, “कृपया मला इथे परत घेऊन जा”
सायलीला पुन्हा समुद्र किनाऱ्यावर जायचय, तिथे फिरायचय, सनसेट पाहायचाय पण हे सध्या शक्य नाही हे तिलाही माहिती आहे. म्हणूनच या फोटोतून ती पुन्हा त्या आठवणी जाग्या करत आहेत. सध्या सायलीसुद्ध घरी आहे आणि नियमांचं पालन करतेय. मात्र लॉकडाउन संपल्यानंतर सायली नक्कीच पुन्हा एकदा समुद्र किनाऱ्यावर जाऊन असा मनसोक्त आनंद लुटेल यात शंका नाही.