सध्या सुरु असलेला कोरोनाचा सुळसुळाट आणि त्यात लॉकडाउन यामुळे घरात बसून काय करायचं हा प्रश्न सगळ्यांना पडलाय. मात्र या प्रश्नाचं उत्तर बहुतांश लोकांना या लॉकडाउनमध्ये सापडतय. म्हणूनच या मिळालेल्या वेळेचा सदुपयोग विविध कामांसाठी केला जातोय.
बिग बॉस मराठी फेम आणि अभिनेत्री वीणा जगतापही घरात बसून विविध गोष्टी करतेय. वीणाने नुकतच आईच्या मदतीन काही झाडं कुंड्यांमध्ये रोपटी आणि झाडं लावली आहेत. याचा व्हिडीओ तिने नुकताच पोस्ट केला आहे. या पोस्टमध्ये खूप छान संदेशही वीणाने कॅप्शनमध्ये लिहीला आहे. ती लिहीते की, “मिट्टी से, मिट्टी पर और फिर मिट्टी में मिल जाना है, बोहोत गहरी बात सीखा देता है एक छोटा सा पौधा अगर जड़ से अलग कर दिया जाए तो " मुरझाने " लगता है...ऐसा ही कुछ हाल इंसानों का भी है,पर इंसान इतना गर्विष्ठ हो चुका है कि सोचता है, ये एक छोटा सा पौधा ही तो है , ये क्या हमे जीने की सीख देगा”
वीणा जगताप ही मागील वर्षी मराठी बिग बॉसच्या दुसऱ्या पर्वात झळकली होती. या शोमध्ये तिचं आणि स्पर्धक शिव ठाकरेचं प्रेम जुळलं. मात्र या लॉकडाउनमध्ये दोघही एकमेकांपासून दूर आपापल्या घरी आहेत. ‘राधा प्रेम रंगी रंगली’ या मालिकेत वीणा मुख्य भूमिकेत झळकली होती.