By  
on  

अभिनयची ‘अशी ही आशिकी’, दिसला मिस्ट्री गर्लसोबत

‘ती सध्या काय करते’ म्हणत आपल्यासमोर आलेला अभिनय बेर्डे एका झुळकेप्रमाणे गायब झाला. बरेच दिवस त्याचे पडद्यावर दर्शन झालं नसल्याने ‘तो सध्या काय करतो’ हे विचारण्याची वेळ त्याच्या चाहत्यांवर आली.

पण अलीकडेच अभिनय एका सिनेमाच्या पोस्टरमध्ये दिसून आला. ‘अशी ही आशिकी’ या सिनेमाच्या पोस्टरमधून अभिनय सर्वांच्या समोर आला आहे.

पण या पोस्टरमध्ये त्याच्यासोबत एका मिस्ट्री गर्लही आहे. या मुलीचं नाव मात्र पोस्टरमध्ये सांगितलेलं नाही. ही मिस्ट्री गर्ल कोण आहे हे जाणून घ्यायचं असेल तर थोडी वाट पाहावी लागेल असंही अभिनय म्हणत आहे.

सचिन पिळगावकर प्रेक्षकांसमोर एका नव्या को-या लव्ह्स्टोरीसह येत आहेत. सुप्रिया पिळगावकर, जोए राजन, वजीर सिंग, भुषण कुमार, कृष्णन कुमार हे सहनिर्माते आहेत.

 

 

Recommended

PeepingMoon Exclusive