सध्या लॉकडाउनमुळे बाहेर जाता येत नसल्याने घरात छान तयार होण्याची संधी फार क्वचितच मिळतेय. त्यातच मोबाईलवर फोटो काढायचा असल्यास किंवा एखादा व्हिडीओ शूट करायचा असल्यासं तयार होता येतय. त्याशिवाय असं कोणतच निमित्त नाही.
मात्र अभिनेत्री श्रेया बुगडे छान साडी नेसून नुकतीच तयार झाली आहे. तर आता श्रेया का तयार झाली आहे ? याचं उत्तर तिने पोस्ट केलेल्या फोटोच्या कॅप्शनमध्ये सापडलय. तर श्रेया नुकताच एक व्हिडीओ शूट केला आहे. या व्हिडीओसाठी ती छान साडी नेसून तयार झाल्याचं ती सांगते. या पोस्टमध्ये श्रेया लिहीते की, “एका छोट्या व्हिडीओचं शूट केलय आणि मी अशी दिसलेय. विश्वास करा खरचं लॉकडाउन सुरु झाल्यानंतरचा हा सगळ्यात आनंदी क्षण होता.”
या आनंदी क्षणाचे हे खास फोटो श्रेयाने शेयर केले आहेत. या फोटोंमध्ये श्रेया अतिशय सुंदर दिसत आहे. अभिनेत्री आणि श्रेयाची मैत्रीण अभिज्ञा भावेने ही साडी तिला दिली असल्याचं ती या पोस्टमध्ये म्हणतेय.
‘चला हवा येऊ द्या’ या शोच्या माध्यमातून ही विनोदी क्विन सगळ्यांना खळखळून हसवत असते.