By  
on  

 अमृता खानविलकरने या बॉलिवुड कलाकाराला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा

अभिनेता विकी कौशलचा वाढदिवस असल्याने त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. त्यातच बॉलिवुड कलाकारांसह त्याचे चाहतेही सोशल मिडीयावर त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा देत आहेत.
अभिनेत्री अमृता खानविलकरनेही विकीला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. सोशल मिडीयावर विकीसोबतचा फोटो पोस्ट करून तिने विकीला शुभेच्छा दिल्या आहेत. 


'राझी' या सिनेमाच्या निमित्ताने अमृताने विकीसोबत काम केलं होतं. या सिनेमादरम्यान दोघांची चांगली मैत्री झाली होती. शिवाय विकीचं मराठी भाषेवरही प्रेम असल्याने तो सेटवर अमृतासोबत कधी कधी मराठी भाषेतही बोलत असे. 


'राझी' सिनेमासाठीच्या विविध मुलाखतीत विकीने अमृताच्या कामाचही कौतुक केलं होतं. 

 

Author

Recommended

PeepingMoon Exclusive