By  
on  

 ‘हे ईश्वर या अल्लाह..’ मराठी कलाकारांचं नवं गाणं

सध्या देशासह जगभरात कोरोना व्हायरसचा सुळसुळाट आहे. कोरोनामुळे सध्या लॉकडाउनही सुरु आहे. मात्र या परिस्थित खचून न जाता मनोधैर्य वाढवण्याचं कामं विविध गाणी करत आहेत. मनोरंजविश्वातील विविध कलाकार सकारात्मक गाणी घेऊन येत आहेत. घरातूनच चित्रीकरण करुन ही गाणी केली जात आहेत.
नुकतच ‘हे ईश्वर या अल्लाह’ हे नवं गाणं प्रदर्शित झालं आहे.  विशाल राणे यांनी हे गाणं लिहीलं असून ते कम्पोजही केलं आहे. ऋषिकेश गांगण आणि सई गांगण यांनी हे गाणं गायलं आहे. या गाण्यात काही मराठी कलाकारही झळकत आहेत.

ऐश्वर्या नारकर, अविनाश नारकर, आशिष जोशी, तृष्णा चंद्रात्रे, रुपल नंद, अक्षय वाघमारे, नयन जाधव, गायक मंगेश बोरगावकर ही कलाकार मंडळी या गाण्यात आहे. 
ईश्वराकडे आणि अल्लाहकडे या भयावर संकटात एक संधी मागत असल्याचं हे गाणं आहे. सध्याच्या कोरोनाग्रस्त परिस्थितीला तोंड देत असताना जात पात विसरून सगले या संकटाला एकत्र सामोरं जात असल्याचाही यात संदेश आहे. व्हिडीओच्या सुरुवातीला अभिनेता इरफान खान आणि ऋषि कपूर यांना यात श्रध्दांजलीही वाहिली आहे. 
 

Author

Recommended

PeepingMoon Exclusive