By  
on  

Birthday Special : अप्सरेच्या या साडीतल्या मनमोहक अदा तुम्हाला करतील फिदा

अप्सरा सोनाली कुलकर्णी ही मराठी सिनेसृष्टीतली गुणी आणि आघाडीची अभिनेत्री . अभिनयासोबतच, नृत्य कलेतही ती पारंगत आहे. सतत नव्याचा ध्यास बाळगून काहीतरी करुन दाखवण्याची जिद्द तिच्यात आहे. सोनाली नेहमीच स्टायलिश राहण्याला पसंती देते, पण त्यासोबतच पांपारिक साडी नेसणं तिला खुप आवडतं. आज सोनालीच्या वाढदिवसानिमित्त तिच्या काही खास साडीतील लुक्सवर एक नजर टाकूयात. 

 

 

सध्या झी युवा वाहिनीवर सोनाली कुलकर्णी परिक्षक असलेला युवा डान्सिंग क्वीन हा शो सध्या बराच चर्चेत आहे. यात परिक्षकांच्या भूमिकेत असलेली सोनी नेहमीच एपिसोडसाठी नवनवीन स्टाईल कॅरी करते व सर्वांचंच लक्ष वेधून घेते. 

 

 

 

'हिरकणी'सारखा सुपरहिट सिनेमा दिल्यानंतर ती लवकरच 'धुरळा'  या मल्टिस्टारर सिनेमातून तिने सर्वांची मनं जिंकली. 

जरीकाठाची साडी, नथ आणि गजरा अशा पेहरावात सोनालीवर हा मराठमोळा साज खुलून दिसतोय. 

 

पारंपारिक साड्यांसोबतच स्टायलिश वेस्टर्न साड्यांचं फ्युजन सोनाली नेहमी बिनधास्त कॅरी करते

 

अप्सरा आली....या गाण्याप्रमाणेच सोनालीची नेहमी एखाद्या कार्यक्रमात किंवा इव्हेटमध्ये मनमोहक रुपात एन्ट्री होते. 

सोनालीच्या विविध अदा नेहमीच चाहत्यांना घायाळ करतात. 

 

अनेक मोठमोठ्या ब्रॅण्डच्या जाहिरातींसाठी सोनाली कुलकर्णीला पसंती दिली जाते. 

 

दागिन्यांच्या या जाहिरांतीसाठीचं सोनाली कुलकर्णीचं हे फोटोशूट खुप लोकप्रिय ठरलं. 

 

साध्या सिंपल साडीतही स्टायलिश दिसण्यावर सोनालीचा भर असतो. 

सोनालीच्या प्रत्येक लुकवर नेहमी चाहत्यांकडून कॉमेंट्स व लाईक्सचा वर्षाव होताना पाहायला मिळतो. 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive