आज करोना संकटामुळे सर्वच दैनंदिन कामं ठप्प आहेत फक्त जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा तेवढा सुरळीत सुरु आहे. आता तर लॉकडाऊनचा चौथा टप्पा सुरु झाला आहे. दरम्यान आपले लाडके सेलिब्रिटीसुध्दा हा वेळ स्वत:च्या कुटुंबियांसोबत घालवत आहे. छंद जोपासत आहेत. काहीतरी नवीन शिकत आहेत. जुन्या आठवणींना उजाळा देत आहेत, किंवा सध्या लॉकडाऊनमध्ये सुरु असलेल्या घडामोडींबद्दल चाहत्यांना सोशल मिडीयावरुन कळवत आहेत.
सध्या या लॉकडाऊनमध्ये सतत विविध पोस्ट व ट्रॅव्हल डायरीच्या माध्यमातून चाहत्यांशी संवाद साधणारी अभिनेत्री प्राजक्ता माळीने नुकतीच एक गोड पोस्ट केली आहे. त्यात तिची गोड चिमुकली भाची यज्ञा हिच्या नखरेल बाललीला पाहायला मिळतायत.
प्राजक्ता ही गोड पोस्ट चाहत्यांशी शेअर करत म्हणते, #आमचीनकटू आमचा #lockdown वरील उतारा... हिच्यामुळे #lockdown सुसह्य झालं आणि lockdown ४.० सुरू झाल्याचं फार काही दुख्ख नाही झालं... आई शप्पथ सांगते, ही जरा जरी मोठी असती आणि स्पष्ट बोलत असती तर “इतकी मजा” नसती आली.
प्राजक्ता व तिच्या या चिमुकल्या भाचीचे अनेक गोड फोटोव व्हिडीओ नेहमी सोशल मिडीयावर पाहायला मिळतात . चाहते नेहमीच त्यावर लाीक्स व कॉमेंट्सचा वर्षाव करतात