By  
on  

सुर नवा ध्यास नवा’च्या सेटवर आला छोटा सांताक्लॉज, पाहा कुणाकुणाला मिळाल्या भेटवस्तू

अलीकडे सगळ्या वयोगटातील प्रेक्षकांच्या पसंतीला उतरलेला कार्यक्रम म्हणजे ‘सुर नवा ध्यास नवा’. या कार्यक्रमातील बाल गायक अप्रतिम आहेतच. पण या सर्वांवर कडी करणारा वल्ली कोण असेल तर तो आहे मॉनिटर म्हणजेच हर्षद नायबळ.

साखरेने पाण्यात जितकं सहज विरघळावं तितक्या सहजतेने मॉनिटर कोणत्याही व्यक्तिरेखेत रंगून जातो.

 

ती व्यक्तिरेखा मग लाल्याची असो, जयरामची असो किंवा शाहिरांची. हर्षद त्याच्या बोबड्या बोलांनी प्रत्येकालाच प्रेमात पाडतो.

या कार्यक्रमातील निवेदिका स्पृहा जोशीने सांता क्लॉजच्या वेशातील हर्षद बरोबरचा एक गोड फोटो शेअर केला आहे. या फोटोवरून सुर नवा... च्या मंचावर हर्षद सांता बनून येणार हे समजायला हरकत नाही.

Recommended

PeepingMoon Exclusive