By  
on  

पाहा Video : अभिनेता अक्षय वाघमारेने पोस्ट केला त्याच्या लग्नसोहळ्यातील हा खास क्षण

अभिनेता अक्षय वाघमारे आणि योगिता गवळी यांचा लग्नसोहळा या लॉकडाउनमध्य़े चांगलाच चर्चेत आला. गँगस्टर म्हणून प्रसिद्ध असेलेल्या अरुण गवळी यांची कन्या योगितासोबत अभिनेता अक्षय वाघमारेचा हा विवाहसोहळा लॉकडाउनमध्येच पार पडला. मात्र पोलिसांच्या परवानगीने आणि मास्क, सॅनिटायझरचा वापर करून त्यांचा हा विवाहसोहळा पार पडला. 

याच लग्नसोहळ्यातील खास क्षण अक्षय वाघमारेने सोशल मिडीयावर पोस्ट केला आहे. ‘शुभमंगल सावधान’ असं छान कॅप्शनही त्याने या व्हिडीओला दिलं आहे. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

शुभमंगल सावधान ️ #glimpse #wedding #yogaks

A post shared by Akshay Waghmare (@akshayswaghmare) on

मागील वर्षी दोघांचा साखरपुडा झाला होता. आणि यावर्षी लॉकडाउनमध्ये त्यांनी काही ठरावीक लोकांच्या उपस्थितीती हा विवाहसोहळा केला. यावेळी अरुण गवळी आणि त्यांचा संपूर्ण परिवारही उपस्थित होता. 
अक्षय वाघमारे आणि योगिता गेल्या काही वर्षांपासून एकमेकांना ओळखतात. त्याने या लग्नसोहळ्याचे फोटोही त्याच्या सोशल मिडीया अकाउंटवर पोस्ट केले आहेत.
 

Author

Recommended

PeepingMoon Exclusive