सध्या लॉकडाउनमध्ये फक्त जिवनावश्यक वस्तूंची दुकाने सुरु असल्याने बाकी गोष्टी मिळवणं कठीण होत आहे. मात्र तरीही घरात राहूनच या सगळ्या गोष्टी केल्या जात आहेत. आता पार्लर, सलोनही बंद आहेत. त्यामुळे केस कापण्यासाठीही बाहेर जाता येत नाही.
अशा परिस्थितीत काही कलाकार घरातच आपले केस कापत आहेत. शनाया म्हणून प्रसिद्ध असलेली अभिनेत्री रसिका सूनीलनेही असच केलं आहे. रसिकाने घरातच तिचे केस कापले आहेत. तिच्या या नव्या हेअर कटचे फोटो तिने पोस्ट केले आहेत. या नव्या हेअर कटला तिने क्वारंटाईन हेअरकट असे म्हटले आहे.
या नव्या लूकमध्येही रसिका सुंदर दिसतेय. चाहत्यांनाही रसिकाचा हा नवा लुक प्रचंड आवडला आहे.