By  
on  

 बालमित्रांसाठी सुबोध भावे दर बुधवारी घेऊन येणार ही गंमत

अभिनेता सुबोध भावे हा त्याच्या छोट्या मित्रांसाठी काही वर्षांपासून विविध गोष्टी घेऊन येतो. सुबोध भावेच्या युट्यूब चॅनलवर या बालमित्रांसाठीच्या या गोष्टी ऐकायला या त्याच्या छोट्या चाहत्यांना प्रचंड आवडतं. सुबोध दादाच्या गोष्टी या नावाने याचे विविध भाग सुबोध युट्यूबवर पोस्ट करतो.
नुकत्याच सांगीतलेल्या गोष्टींवरून चित्र काढण्याचा टास्क सुबोधने या बालमित्रांना दिला होता. आणि त्यावर लगेचच या बालमित्रांनी सुबोधला विविध चित्रे पाठवली. ही चित्रे सुबोधला प्रचंड आवडली आणि मग त्याने त्याची प्रतिक्रिया देण्यासाठी या बालमित्रांसाठी एक व्हिडीओ त्याच्या इन्स्टाग्रामवर पोस्ट केला. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

नमस्कार माझ्या बालमित्रांनो... तुमच्यासाठी एक गम्मत या आठवड्यापासून... दर बुधवारी फक्त तुमच्यासाठी एक व्हिडियो मी इथे पोस्ट करणार... कधी तुम्ही पाठविलेली चित्र तर कधी तुमचाच एखादा व्हिडियो... तुम्ही म्हटलेली गाणी, कविता, सांगितलेल्या गोष्टी किंवा वाजविलेलं वाद्य... तुमच्या प्रतिक्रियांना माझ्याकडून हे एक छोटंसं रिटर्न गिफ्ट... एन्जॉय ️️ आणि हो.. गोष्टी ऐकण्यासाठी Subodh Bhave ह्या माझ्या YouTube channel ला नक्की Subscribe करा.. #subodhbhave #youtube #story #marathi #marathistory #newproject #marathiactor #superstar #kids #forkids #storytelling #linkinbio #goodmorning #saturday #firstlove #storytime #creativework #happykids #storysession #everysaturday #webseries #instagram #subodhdadachigoshta #midweekvibes

A post shared by Subodh Bhave (@subodhbhave) on

हे रिटर्न गिफ्ट देत सुबोधने आणखी एक घोषणा या बालमित्रांसाठी केली आहे. आता सुबोध दर बुधवारी या बालमित्रांसाठी असा एक व्हिडीओ त्याच्या सोशल मिडीया अकाउंटवर पोस्ट करणार आहे. 
लहान मुलांना गोष्टीची, कवितांची, चित्रकलेची आवड जोपसण्यासाठी आणि त्याची गोडी निर्माण व्हावी यासाठीचा अभिनेता सुबोध भावेचा हा प्रयत्न आहे. त्याला या प्रयत्नात यश मिळत असल्याचं यातून पाहायला मिळतय.
 

Author

Recommended

PeepingMoon Exclusive