By  
on  

 ‘तुझ्यात जीव रंगला’ मधील या अभिनेत्याने कापले पत्निचे केस, हेअर कट केल्यावर पाहा काय झालं

'तुझ्यात जीव रंगला' या मालिकेतील प्रत्येक भूमिका प्रेक्षकांना आवडली. त्यातच सन्नी दा साकारणारा अभिनेता राज हंचनाळे यालाही प्रेक्षकांच्या पसंतीची पावती मिळाली. राज लॉकडाउनमुळे घरीच आहे मात्र घरात बसूनही तो विविध गोष्टी करतोय. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

When wife asks you to trim her hair

A post shared by Raj Hanchanale (@raj_hanchanale) on

नुकतच राजने त्याच्या सोशल मिडीया अकाउंटवर असे काही फोटो पोस्ट केले की सगळ्यांनाच धक्का बसला. मात्र कॅप्शन वाचल्यावर जीवात जीव आला. या फोटोमध्ये राजच्या हातात कापलेल्या केसांचा झुपका पाहायला मिळतोय. या फोटोतील त्याचे आश्चर्यचकित हावभाव आणखी प्रश्न निर्माण करतात. मग कॅप्शन वाचल्यावर कळतं की राजने चक्क त्याच्या पत्निचे केस कापले आहेत.लॉकडाउमुळे सध्या सलोन, पार्लर बंद आहेत. त्यामुळे घरात असलेले राज सारखेच जोडीदार एकमेकांना केस कापण्यात मदत करत आहेत. केस कापण्याचा फोटो पोस्ट करण्याचा ट्रेंड सुरुवातीला अभिनेत्री अनुष्का शर्माने सुरु केला होता. अनुष्काने लॉकडाउनमध्येच पति विराट कोहलीचे केस कापतानाचे फोटो पोस्ट केले होते. 

मात्र राजच्या या फोटोमध्ये दिसतोय फक्त राज आणि त्याच्या पत्निचे कापलेले केस. तेव्हा पत्निचा हेअरकट राजने केला तरी कसा यासाठी तिच्या लुकच्या फोटोची उत्सुकता आहे.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive