By  
on  

अनुराग कश्यपच्या या चित्रपटात झळकणार हे मराठी कलाकार

दिग्दर्शक अनुराग कश्यपच्या चित्रपटांचा जॉनर वेगळा असतो. त्यामुळे त्याचे चित्रपट आवर्जुन पाहिले जातात. सध्या लॉकडाउनमध्ये अनुराग हा नेटफ्लिक्सवर त्याचा आगामी चित्रपट घेऊन येत आहे. ‘चोक्ड’ असं या चित्रपटाचं नाव आहे. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाच्या पोस्टरने उत्सुकता निर्माण झाली होती. आणि आता या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. अभिनेत्री सैयामी खेर यात प्रमुख भूमिकेत आहे. बेसीनच्या पाईपमधून मिळालेला पैशांचा बंडल त्यामुळे बदललेलं मध्यमवर्गीय आयुष्य हे या ट्रेलरमध्ये पाहायला मिळतय. शिवाय अचानक नोटबंदीची घोषणा होते आणि मग या पैशांचं काय होतं हे या चित्रपटात पाहायाल मिळेल.सैयामी खेरने ‘मिर्झ्या’ या हिंदी चित्रपटातून डेब्यू केला होता. त्यानंतर ‘माऊली’ या मराठी चित्रपटातही ती झळकली होती. 

 

या चित्रपटात अभिनेत्री अमृता सुभाष, तुषार दळवी, उपेंद्र लिमये हे मराठी कला विश्वातील कलाकारही आहेत. अमृता सुभाषने या आधीही अनुराग कश्यपच्या ‘रमन राघवन 2.0’ आणि ‘सेक्रेड गेम्स 2’ या प्रोजेक्टमध्ये काम केलं आहे. 

 

याशिवाय या चित्रपटात रोशन मॅथ्यू, राजश्री देशपांडे या कलाकारांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत. येत्या 5 जूनला हा चित्रपट नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होईल.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive