By  
on  

अभिनेत्री मधुरा देशपांडेला या अभिनेत्याने दिली ही खास भेटवस्तू, मधुरा विचारते "कोण आहेस तू ? "

या लॉकडाउनमध्ये बहुतांश लोकं त्याच्या जवळच्या व्यक्तिंपासून दूर आहेत. काही त्यांच्या मित्र-मैत्रिणींपासून दूर आहेत. मात्र घरात बसूनही आपल्या मित्र-मैत्रिणींना कसं खूश करायचं हे अभिनेता अक्षय केळकरला चांगलच जमलय. 

अक्षय हा उत्तम चित्र काढतो. त्याने त्याच्या कपड्यांवरही सुंदर चित्र काढलेली आहेत. मात्र नुकतच त्याने त्याची मैत्रीण मधुरा देशपांडेचं चित्र काढलं. त्याने तिच्या एका फोटोप्रमाणे सेम टू सेम पेंटिंग काढली आहे. ही पेंटिंग हुबेहुब मधुरी सारखी दिसतेय. मधुराने जेव्हा  हे पाहिलं तेव्हा तिचा आनंद गगनात मावेनासा झाला. आणि मग तिने लगेचच तिच्या सोशल मिडीया अकाउंटवर हे  चित्र पोस्ट केलं. ती या पोस्टमध्ये लिहीते की, “माझ्या मित्राने मला हे अविश्वसनीय चित्र काढून मला आश्चर्यचकित केलं आहे. बाबा तू काय आहेस ? तू कोण आहेस ?” असं म्हणत मधुराने अक्षयचं कौतुक केलं आहे. 


अक्षय हा मराठी मालिका आणि चित्रपटांमध्ये काम करतो. शिवाय त्याने नुकतीच ‘भाखरवडी’ ही हिंदी मालिकाही केली आहे.
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

Painted by me!

A post shared by Akshay Kelkar (@akshaykelkar) on

Author

Recommended

PeepingMoon Exclusive