प्रत्येकाच्या लहानपणीच्या आठवणीत काहीना काही गमती नक्कीच असतात. आणि सध्या लॉकडाउनच्या काळात या जुन्या सोनेरी आठवणींमध्ये बरीच जणं रमत आहेत. यातच अभिनेता भूषण प्रधानलाही त्याच्या लहानपणीच्या एका गोष्टीची आठवण झाली आहे. भूषण लहानपणी कराटेच्या शिकवणीला जात असे. आणि त्याचा लहापणीचा फोटोही त्याने पोस्ट केला आहे. मात्र या फोटोमागची खरी कहाणी त्याने कॅप्शनमध्ये लिहीली आहे. भूषणला कराटे क्लासेस पेक्षा त्याचा गणवेश अत्यंत प्रिय होता. आणि म्हणूनच त्याने त्याच्या या आवडत्या कराटे जी घातलेला फोटो त्याने पोस्ट केला आहे.
या पोस्टमध्ये भूषण म्हणतो की, “कराटे किड, लहानपणी मला कराटेचा गणवेश (कराटे जी) हा कराटेपेक्षा जास्त आवडायचा. आणि म्हणूनच मी कराटे जी मिळेपर्यंत काही आठवडे कराटेच्या शिकवणीला गेलो. आणि त्यानंतर मी क्वचितच क्लासला गेलो. ते खूपच कठीण होतं पण तरीही मी माझ्या पालकांना समजावलं की मला त्या क्लासेसला जायचे नाही. कारण मी ऐकलं होती की त्याने उंची खुंटते, माझ्या पोटात दररोज जोरजोरात गुच्चे मारले जायचे, ही आणि खूप कारणं होती. मी व्हाईट बेल्ट कराटे किडचं राहिलो. हॉर्स स्टान्स आणि साईड स्कॉड्स या गोष्टी मी त्या दरम्यान क्लासेसमध्ये शिकलो. मला खात्री आहे की आईने माझा हा गणवेश जपून ठेवला असेल.”
लॉकडाउनमुळे भूषणही त्याच्या परिवारासोबत घरीच आहे. आणि या दरम्यान तो या जुन्या आठवणींना उजाळा देत आहे. शिवाय भूषण फिटनेस फ्रिक असल्याने तो दररोज नियमीत व्यायामही करतोय. भूषण सध्या घरात कुकिंगही करतोय. या सगळ्या गोष्टी त्याच्या सोशल मिडीया अकाउंटवर पाहायला मिळतात.