By  
on  

 अमेय वाघला पडलाय हा प्रश्न, नेटकऱ्यांकडे मागितलं उत्तर

सध्याच्या लोकडाउनमध्ये मराठी कलाकारांपैकी सोशल मिडीयावर सगळ्यात जास्त सक्रीय असेल तर तो आहे अभिनेता अमेय वाघ. फक्त सक्रीयच नाही तर तो सोशल मिडीयावर नेटकऱ्यांचं मनोरंजनही करतोय. नुकतच त्याने  ‘वाघचा स्वॅग’ नावाचं युट्यूब चॅनेलही सुरु केलय. 
सोशल मिडीयावरही तो त्याचे मजेशीर व्हिडीओ सध्या पोस्ट करतोय. नुकताच अमेय वाघने एक फोटो पोस्ट केला आहे. फक्त फोटोच नाही तर त्याने कॅप्शनमध्ये चाहत्यांना विचारला आहे एक प्रश्न. अमेय या कॅप्शनमध्ये लिहीतो की, “ घरी केस कापायची रिस्क घ्यावी ? की हेअरबँड वापरावं ?” हा प्रश्न त्याने नेटकऱ्यांना केला.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

घरी केस कापायची risk घ्यावी ? की hairband वापरावं ?

A post shared by amey wagh (@ameyzone) on

मात्र या पोस्टवरून त्याच्या इतर कलाकार मित्र-मैत्रिणींच्या कमेंट्सही आल्या आहेत. या कमेंट्समध्ये बहुतांश लोकांनी “केस कापू नको, हेअरबँड वापर” असं म्हटलय. मात्र अमेय हा यापैकी कुणाचं ऐकतोय हे पाहणं इंटरेस्टिंग ठरेल. आता अमेय केस कापतोय की नाही यासाठी त्याचे सोशल मिडीया अपडेट्स पाहावे लागतील एवढं नक्की.
 

Author

Recommended

PeepingMoon Exclusive