By  
on  

जगभरातील भारतीय रसिकांसाठी सुबोध भावे करणार ऑनलाईन अभिवाचन कार्यक्रम

लॉकडाउनच्या काळात मनोरंजन विश्वातील कामं ठप्प झाली आहे. सगळ्या प्रकारचे चित्रीकरण बंद असल्याने कला विश्वातील कलाकार घरातच बसून आहेत. यातच घरात बसूनही काही कलाकारांनी ऑनलाईन कार्यक्रम सुरु केले आहेत.
अभिनेता सुबोध भावे हा त्याच्या बालमित्रांसाठी तर विविध व्हिडीओ करतो. मात्र सुबोधचा एखादा कार्यक्रम पाहण्याचीही त्याच्या चाहत्यांची उत्सुकता होती. आणि म्हणूनच या चाहत्यांसाठी सुबोध भावे घेऊन येत आहे एक खास कार्यक्रम. जगभरातील भारतीय रसिकांसाठी सुबोध भावे खास अभिवाचनाचा कार्यक्रम घेऊन येत आहे. येत्या रविवारी रात्री भारतीय प्रमाण वेळेनुसार दहा वाजता सुबोधचा हा कार्यक्रम ऑनलाईन लाईव्ह पाहता येणार आहे. या कार्यक्रमात सुबोध मराठीतील कथा, नाट्यप्रवेश यांचं अभिवाचन करेल. शिवाय या कार्यक्रमाच्या निमित्ताने  पहिल्यांदाच हिंदी कथेचही वाचन करेल. तिकीट काढून हा कार्यक्रम पाहता येणार आहे.

अभिनेता सुबोध भावेचे असंख्य चाहते आहेत. तेव्हा या ऑनलाईन कार्यक्रमाला आणि त्याच्या अभिवाचनाच्या या प्रयत्नाला उदंड असा प्रतिसाद मिळेल यात शंका नाही. सध्या लॉकडाउनमध्ये सुबोध भावे त्यांच्या कुटुंबासोबत वेळ घालवतोय. सोशल मिडीयावर सुबोध जुन्या आठवणींना उजाळाही देतोय. बालमित्रांसाठी त्याने सुबोध दादाची गोष्ट ही व्हिडीओ सिरीज सुरु केली होती. आणि ते व्हिडीओही तो या दरम्यान पोस्ट करत आहे. 

Author

Recommended

PeepingMoon Exclusive