By  
on  

Photos : सिध्दार्थ चांदेकरचा हा स्टायलिश रुबाब पाहून तुम्ही म्हणाल Wow

मराठी सिनेविश्वातला हॅण्डसम हिरो आणि 'चॉकलेट बॉय' म्हणून प्रसिध्द असलेला अभिनेता सिध्दार्थ चांदेकर त्याच्या सिनेमांसारखाच प्रत्यक्ष आयुष्यातसुध्दा नेहमी स्टायलिश राहण्यावर भर देतो,चला तर एक नजर टाकूयात सिध्दार्थच्या खास स्टायलिश लुक्सवर. 

 

आकर्षक व्यक्तिमत्वाने तरुणाईला भुरळ पाडणारा हॅण्डसम अभिनेता अशी त्याची ओळख आहे. 

 

 

कुठल्याही बॉलिवूड हिरोपेक्षा सिध्दार्थची पर्सनॅलिटी तसूभरही कमी नाही. 

 

स्क्रिनवर लुक्समुळे तो जितका उजवा ठरतो तितकाच आपल्या दमदा अभिनयाने तो रसिकांची मनं जिंकतो. 

 

२००७ साली 'हमने जिना सिख लिया' या हिंदी सिनेमातून सिद्धार्थने आपल्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली. त्यानंतर 'अग्निहोत्र' या मराठी मालिकेतून सिद्धार्थ चांदेकर हे नाव घराघरात पोहोचलं. 

 

सिनेमा असो नाटक , मालिका किंवा  वेबसिरीज सिध्दार्थच्या अभिनयाची जादू चौफेर पाहायला मिळते. 

 

सिद्धार्थने मराठीत अनेक पुरस्कार सोहळ्याने आणि कार्यक्रमांचे सूत्रसंचालन केले आहे. त्यामुळे एक उत्तम निवेदक म्हणूनसुद्धा सिद्धार्थची ओळख आहे. 

 

सिध्दार्थ सोशल मिडीयावर सतत सक्रीय असतो.

 

सिध्दार्थला चाहत्यांशी संवाद साधायला फार आवडतं. 

अस्सल पुणेकर असलेला सिध्दार्थ मराठी सिनेसृष्टीतला कूल डूड आहे. 

 

सिध्दार्थच्या प्रत्येक फोटोंवर चाहते नेहमी कौतुकाचा वर्षाव करतात. 

 

 

सिध्दार्थचा स्टायलिश रुबाब तरुणींना नेहमीच घायाळ करणारा ठरतो.

 

सिध्दार्थच्या आगामी प्रोजेक्टसची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive