अमेय वाघने शेअर केलं त्याच्या या फोटो मागचं सिक्रेट

By  
on  

लॉकडाऊनमुळे घराबाहेर पडता येत नसलं तरी अभिनेता अमेय वाघ सोशल मिडियाच्या माध्यमातून चाहत्यांच्या भेटीला येत आहे. यासोबतच अमेय सध्या पत्नी साजिरीला घरकामात मदतही करताना दिसत आहे. अलीकडेच त्याने लाटलेल्या गोल पोळीचा फोटो शेअर केला आहे. अमेय घरातील काही काम करून झालं की अनेकदा भन्नाट कॅप्शनसहित फोटो पोस्ट करत असतो. आताही त्याचं असंच काहीसं झालं आहे. 

 

 

त्याने नुकताच एक फोटो शेअर केला आहे. या फोटोच्या कॅप्शनमध्ये तो म्हणतो, ‘This is my ‘आत्ताच machine मधले कपडे वाळत घातले’ face !’ त्याच्या या पोस्टवर नेटिझन्सनी अनेक भन्नाट कमेंट्स केल्या आहेत. यासोबतच अमेयने स्वत:चं युट्यूब चॅनलचं सुरु केले आहे. या युट्यूब चॅनलचं नाव त्याने 'वाघ चा स्वॅग' असं ठेवलय. त्यामुळे या माध्यमातूनही तो चाहत्यांच्या भेटीला येतो आहे.

Recommended

Loading...
Share