By  
on  

धम्माल मनोरंजनासाठी लवकरच येतोय 'थापाड्या'

तुम्ही कधी मारली कुणाला थाप? ती समोरच्याला पचली की तुम्ही तोंडावर आपटले? तुमचा एखादा मित्र आहे का थापाड्या? थाप मारताना मज्जा येते ना? मग असाच एका भन्नाट ‘थापाड्या’ची धम्माल अनुभवायला सिनेमागृहात जावं लागणार आहे.

अजित बाबुराव शिरोळे दिग्दर्शित ‘थापाड्या’ हा मराठी सिनेमा लवकरच प्रदर्शित होत आहे. भाऊसाहेब भोईर, शरद म्हस्के यांची निर्मिती असलेल्या ‘थापाड्या’ मध्ये निर्मिती सावंत यांचा मुलगा भिनेता अभिनय सावंत, मानसी मुसळे, सोनाली गायकवाड, ब्रिंदा पारेख, मोहन जोशी, कमलाकर सातपुते, सुरेखा कुडची, दीपक करंजीकर, सुनील गोडबोले, विनीत भोंडे, संतोष रासने, प्रदीप कोथमिरे यांच्या प्रमुख भूमिका आहेत. तर वास्तूतज्ज्ञ, ज्योतिर्विद आनंद पिंपळकर विशेष भूमिकेत दिसणार आहेत.

 

मानसी फिल्म्स प्रॉडक्शन निर्मित, मास्क ग्रुप प्रस्तुत 'थापाड्या' येत्या ४ जानेवारी २०१९ रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होत आहे.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive