By  
on  

शिव आणि वीणा एकत्र येणार चाहत्यांच्या भेटीला, पाहा हे आहे निमित्त 

बिग बॉस मराठीच्या दुसऱ्या पर्वातील दोन स्पर्धकांची प्रचंड चर्चा झाली होती. शिव ठाकरे आणि वीणा जगताप या दोघांची जोडी दुसऱ्या सिझनमध्ये चांगलीच गाजली. बिग बॉसच्या घरातली दोघांची मैत्री  आणि त्या मैत्रीचं प्रेमात झालेलं रुपांतर या सगळ्या गोष्टी बिग बॉसच्या घरात पाहायला मिळाल्या होत्या. प्रेक्षकांना बिग बॉसच्या घरातली ही जोडी प्रचंड आवडली.  शिव ठाकरे बिग बॉसच्या दुसऱ्या पर्वाचा विजेताही झाला. मात्र त्याच्या या विजयाचा सगळ्यात जास्त आनंद वीणालाही होता. 

 

बिग बॉसच्या घराबाहेरही या राजा राणीची प्रेमकहाणी सुरु राहीली. सध्या लॉकडाउनमध्ये दोघही एकमेकांपासून दूर आहेत. तरी चाहत्यांच्या आग्राहस्तव दोघं एकत्र पाहायाला मिळणार आहेत. बिग बॉस सिझन 2 ला एक वर्ष पूर्ण होत असल्याच्या निमित्ताने शिव आणि वीणा त्यांच्या इन्स्टाग्राम या सोशल मिडीया प्लॅटफॉर्मवर लाईव्ह पाहायला मिळतील. या लाईव्हमध्ये दोघही आपापल्या घरातून लाईव्ह जोडले जातील आणि त्यांच्या चाहत्यांशी संवाद साधतील. 

सोशल मिडीयावर शिव-वीणाचे असंख्य चाहते आहेत. शिवाय दोघही एकत्र फोटो आणि व्हिडीओ त्यांच्या सोशल मिडीया अकाउंटवर पोस्ट करत असतात. या दोघांनाही चाहत्यांच मिळणार प्रेम आणि बिग बॉसच्या घरातील प्रवास याविषयी ते या लाईव्ह कार्यक्रमात बोलतील.
या जोडीला या निमित्ताने पुन्हा एकत्र पाहण्याची संधी त्यांच्या चाहत्यांना मिळणार आहे. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

Tum Ho Paas Mere... Saath Mere Tum Ho ️ @shivthakare9 #touchwood

A post shared by Veena Nirmala Mahendra Jagtap (@veenie.j) on

 

Author

Recommended

PeepingMoon Exclusive