आज देशभर मुस्लीम बांधव ईद साजरी करणार आहेत. करोना संकटामुळे लॉकडाऊन जाहीर करण्यात आल्याने दरवर्षीप्रमाणे यंदा ईदचा उत्साह पाहायला मिळत नसला तरी प्रत्येक जण घरीच ईद साध्या पध्दतीने साजरी करणार आहेत. अनेक जण सोशल मिडीयाच्या माध्यमातून ईद साजरी करत शुभेच्छांचा वर्षाव करतायत. मराठीतील हॉट आणि ग्लॅमरस अभिनेत्री अमृता खानविलकरने ही खास स्टाईलने ईदच्या सर्वांना शुभेच्छा दिल्या आहेत.
अमृताने तिने साकारलेल्या दोन मुस्लीम व्यक्तिेखांच्या माध्यमातून ईदच्या शुभेच्छा दिल्या आहेत. अमृताने कट्ट्यार काळजात घुसली या ब्लॉकब्लस्टर मराठी सिनेमात मुनीरा ही मुस्लीम तरुणीची लक्षवेधी भूमिका साकारली होती. तर राझी या सुपरहिट बॉलिवूड सिनेमात तिने झरीना ह्या झरीना या मुस्लीम व्यक्तिरेखा साकारुन मराठीसह सर्व हिंदी रसिकांचीसुध्दा मनं जिंकली. तिच्या या दोन्ही भूमिकांचं त्यावेळेस प्रचंड कौतुक झालं होतं.