By  
on  

माधुरी दीक्षितच्या पहिल्या मराठी सिनेमाला झाली 2 वर्षे पूर्ण, या आहेत या सिनेमाविषयीच्या खास गोष्टी

ती झळकते हिंदी सिनेमात मात्र प्रत्येक मराठी माणूस तिच्यावर जिवापाड प्रेम करतो. मराठी प्रेक्षकांच्या आवडत्या अभिनेत्रींच्या लिस्टमध्ये ती नेहमीच असते. जिची अदा, हास्य, नृत्य आणि सगळचं प्रेक्षकांना आवटतं ती अभिनेत्री आहे माधुरी दीक्षित. आणि म्हणूनच ही सौंदर्यवती मराठी सिनेमात कधी झळकणार याचीच सगळ्यांना उत्सुकता होती. 2018 मध्ये आलेल्या ‘बकेट लिस्ट’ या मराठी सिनेमात माधुरी झळकली आणि तिला मराठी सिनेमात पाहण्यासाठी आसुसलेले प्रेक्षक सुखावले.


या सिनेमाला आज दोन वर्षे पूर्ण झाली आहेत. माधुरीचा हा पहिलाच मराठी सिनेमा असला तरी करण जौहरच्या धर्मा प्रोडेक्शनचाही हा पहिलाच मराठी सिनेमा आहे. दिग्दर्शक तेजस देओकर यांनी या सिनेमाचं दिग्दर्शन केलं होतं. माधुरीसोबत या सिनेमात सुमीत राघवन, वंदना गुप्ते, प्रदीप वेलणकर, शुभा खोटे, दिलीप प्रभावळकर, इला भाटे, रेणुका शहाणे, सुमेध मुदगलकर हे आणि इतर कलाकार झळकले होते. या सिनेमाच्या निमित्ताने तब्बल 23 वर्षांनी माधुरी दीक्षित आणि रेणुका शहाणे एकत्र झळकल्या होत्या. सेटवरही त्यांची मैत्री पाहायला मिळाली होती. एवढच नाही तर त्यांचा सेटवरील एक व्हिडीओ प्रचंड व्हायरल झाला होता. ‘लो चली मै’ या गाण्यावर दोघींनी या सिनेमाच्या सेटवर डान्स केला होता.

‘बकेट लिस्ट’ सिनेमाच्या प्रमोशनवेळी पिपींगमूनला दिलेल्या मुलाखतीत माधुरीने मराठी सिनेमांविषयीची एक महत्त्वाची गोष्ट सांगीतली होती. माधुरी म्हटली होती की, “मराठी सिनेमे हे फक्त महाराष्ट्रीयन पाहत नाहीत, तर विविध भाषीय प्रेक्षकही हे मराठी सिनेमे पाहत असतात.” माधुरी तिच्या चाहत्यांना रिलेट होईल , महाराष्ट्रीयन प्रेक्षकांना रिलेट होईल अशा मराठी सिनेमाच्या शोधात होती आणि म्हणूनच बकेट लिस्टच्या माध्यमातून माधुरीने मराठीत पदार्पण केलं होतं.

या सिनेमाचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे या सिनेमात बॉलिवुड स्टार रणबीर कपूरही झळकला होता. रणबीर ने  या सिनेमात गेस्ट अपिअरन्स केला होता. य़ा सिनेमाच्या निमित्ताने माधुरीने बाईकही चालवली होती. तर माधुरी मराठमोळ्या नऊवारीतही तयार झाली होती. माधुरीला या मराठी सिनेमात पाहून कित्येक चाहत्यांची बकेट लिस्ट पूर्ण झाली असणार यात शंका नाही.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive