By  
on  

बिग बॉस मराठीची प्रसिद्ध जोडी शिव-वीणा लाईव्ह आले एकत्र 

मराठी बिग बॉसच्या दुसऱ्या पर्वाचा विजेता ठरला होता शिव ठाकरे. मात्र दुसऱ्या सिझनमध्ये एक जोडी चांगलीच चर्चेत राहिली ती म्हणजे शिव ठाकरे आणि वीणा जगताप यांची. बिग बॉसच्या घरात दोघांची मैत्री झाली आणि या मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं. नंतर बिग बॉसच्या घरातून बाहेर पडल्यानंतही हे नातं कायम राहिलं आणि अजूनही चाहते या जोडीवर प्रेमाचा वर्षाव करतच आहेत. सोशल मिडीयावर तर दोघांचे फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत असतात. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

ShiVeena Live... One Year Of Bigg Boss & One Year Of Togetherness

A post shared by Shiv Thakare (@shivthakare9) on

यातच लॉकडाउनमध्ये दोघं आपापल्या घरी आहेत. हा दुरावा असला तरी एका खास दिवसासाठी हे दोघं एकत्र आले आहेत. एकत्र म्हणजे सोशल मिडीयावर दोघांनी नुकतच त्यांच्या चाहत्यांसाठी लाईव्ह व्हिडीओ केला. निमित्त होतं बिग बॉस मराठीच्या त्यांच्या प्रवासाला एक वर्ष पूर्ण झाल्याचं. यावेळी लाईव्ह येऊन दोघांनी त्यांच्या बिग बॉसच्या प्रवासाच्या आठवणींना उजाळा दिला. 

Author

Recommended

PeepingMoon Exclusive