By  
on  

नंदीता वहिनींकडून ईदच्या शुभेच्छा, या पेहरावात दिसली इतकी सुंदर

रमजान ईदच्या निमित्ताने सोशल मिडीयाचे पेज आज शुभेच्छांनी भरले आहेत. कलाकारांनी तर त्यांच्या विविध पेहरावात ईदच्या शुभेच्छा देणाऱ्या पोस्ट केल्या आहेत. 

‘तुझ्यात जीव रंगला’ या मालिकेतून नंदीता वहिनी म्हणून प्रसिद्ध असलेल्या धनश्री कडगावकरनेही ईदच्या शुभेच्छा दिल्या आहेत. युवा डान्सिंग क्विन शोमधील तिच्या सुंदर पेहरावातील फोटो पोस्ट करून तिने या शुभेच्छा दिल्या आहेत. या फोटोंवर चाहत्यांच्या लाईक्सचा वर्षाव होत आहे.

धनश्रीने ‘तुझ्यात जीव रंगला’ मालिकेत साकारलेली नंदीता वहिनीची भूमिका प्रचंड गाजली. तेव्हापासून तिला वहिनी साहेब अशी ओळखही मिळाली. तर ‘युवा डान्सिंग क्विन’ या शोमध्येही धनश्री स्पर्धक म्हणून दिसली. या शोमध्येही तिने तिच्या डान्सिंग टॅलेंटने सगळ्यांनी मनं जिंकली. धनश्री ही भरतनाट्यम हा डान्स फॉर्म शिकली आहे. तिला नृत्याची आवड आणि शिवाय डान्सिंग क्विन शोमध्ये तिने एकापेक्षा एक परफॉर्मन्स दिले आहेत.  

Author

Recommended

PeepingMoon Exclusive