By  
on  

‘टाईमपास’ चित्रपटातील हा फेमस डायलॉग आठवतोय का ? रवि जाधव  यांनी पोस्ट केली आठवण

‘टाईमपास’ मधील दगडू-प्राजू आठवतात का तुम्हाला ? आठवणारच कारण त्यांनी प्रेक्षकांचं भरपूर मनोरंजन केलं होतं. आणि याच भूमिका प्रेक्षकांसाठी घेऊन आले होते प्रसिद्ध दिग्दर्शक रवि जाधव.
दिग्दर्शक रवि जाधव सध्या त्यांच्या चित्रपटातील विविध आठवणी या लॉकडाउनच्या काळात सोशल मिडीयावर शेयर करत आहेत. आता रवि जाधव यांचे चित्रपट म्हटले तर ‘टाईमपास’ चित्रपटाची आठवण न करून कसं चालेल. म्हणूनच नुकतीच ‘टाईमपास’ या चित्रपटाची खास आठवण रवि जाधव यांनी शेयर केली आहे.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

थोडा विरंगुळा. थोडा टाइमपास. #nostalgia #memories #superseuparhit

A post shared by Ravi Jadhav (@ravijadhavofficial) on

 

या चित्रपटातला प्रसिद्ध डायलॉग आणि तो प्रसिद्ध सीन रवि यांनी पोस्ट केला. प्रेक्षकांना केतकी माटेगावकर म्हणजेच या चित्रपटातील प्राजूचा हा डायलॉग  आणि हा सीन प्रचंड  आवडला होता. आणि त्याचीच आठवण रवि जाधव यांनी या निमित्ताने करून दिली आहे. ते या पोस्टमध्ये लिहीतात की, “सहज, थोडा विरंगुळा. थोडा टाइमपास.” 
2014मध्ये टाईमपास हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. अभिनेता प्रथमेश परब आणि गायिका-अभिनेत्री केतकी माटेगावकर या चित्रपटात प्रमुख भूमिकेत झळकले होते.
 

Author

Recommended

PeepingMoon Exclusive