सामान्यत: आपल्यापैकी अनेकजण समोरच्याची परिक्षा रंग रुपावरून करतात. पण अनेकदा बदकांमध्ये एखादा राजहंस लपलेला असतोच की !
अशाच काहिशा आशयाचं नाटक घेऊन आला आहे संजय नार्वेकर. या नाटकाचं नाव आहे होते कुरुप वेडे. होते कुरुप वेडे या नाटकाच्या निमित्ताने संजय नार्वेकरच्या दर्जेदार अभिनयाची झलक रसिकांना पहायला मिळेल यात शंका नाही.
या नाटकाचं पोस्टर नुकतंच रिलीज झालं असून त्यात संजय नार्वेकर एकाच चेह-यावर दोन वेगळी रुपं वागवताना दिसत आहे. त्यातलं एक साध्या सामान्य रुपाच्या व्यक्तीचं आहे. तर दुसरं गॉगल लावलेल्या टापटिपितील व्यक्तीचं आहे. यामागे काय रहस्य आहे ते नाटक पाहिल्यावरच कळू शकेल. या नाटकाचं दिग्दर्शन राजेश देशपांडे यांनी केलं आहे.