By  
on  

सोनाली कुलकर्णीने लोभस फोटो शेअर करत ताज्या केल्या 90’s च्या आठवणी

लॉकडाऊनमध्ये घरबसल्या आवडी-निवडींना छंदांना उजाळा दिला जात आहे. अनेकजण जुने फोटो, आठवणी शेअर करत आहेत. अभिनेत्री सोनाली कुलकर्णीनेही असंच काहीसं केलं आहे. सोनालीने तिचा लहानपणीचा एक गोड फोटो शेअर केला आहे. यामध्ये 90च्या दशकातील ब-याच गोष्टींचा उल्लेख तिने केला आहे.

 

 

या फोटोच्या कॅप्शनमध्ये सोनाली म्हणते, ‘ponds dreamflower girl since 90s...... Godrej चं कपाट. सतत कौतुकाने Photo काढत असणारी आई (mirror मध्ये दिसतीये) Foldable खुर्ची,  Jai काज़ल आणि हा black & white Tv 
Can you guess the brand/company? आठवतायत का या गोष्टी ?’ 
या फोटोमध्ये सोनालीने घागरा ड्रेस घातला आहे. सोनालीचा हा फोटो खुपच क्युट दिसत आहे यात शंका नाही.

Recommended

PeepingMoon Exclusive