बिग बॉस मराठीच्या दुसऱ्या सिझनला नुकतीच एक वर्षे पूर्ण झाली आहेत. आणि याच निमित्ताने दुसऱ्या सिझनचा भाग असलेल्या अभिनेता अभिजीत केळकरने बिग बॉसच्या घरातील आठवणी शेयर केल्या आहेत.
बिग बॉसच्या घरातील त्याच्या अविस्मरणीय प्रवासातील काही खास क्षण त्याने पोस्टे केले आहेत.
या पोस्टमध्ये अभिजीत लिहीतो की, “सफर खूबसुरत है मंजिल से भी... मी कधीच चिंता केली नाही की मी जिंकलो किंवा हरलो. मी प्रत्येक क्षण जगलो आणि नेहमी खरा राहिलो स्वत:सोबतही आणि दुसऱ्यांसोबतही. मी त्यांना कमावलं आणि स्वत:लाही. धन्यवाद बिग बॉस या सगळ्यासाठी. माझ्या हृद्यात तुमच्यासाठी नेहमीच एक खास जागा असेल.” असे म्हणत अभिजितीने बिग बॉसचे आभार मानले आहेत. या फोटोंमध्ये त्याने त्याची मुलं बिग बॉसच्या घरात आले होते तो क्षण, शिव ठाकरे सोबतची मैत्री, गायिका वैशालीसोबतची मैत्री, घरातील हे खास क्षण पोस्ट केले आहेत.
बिग बॉस मराठीच्या घरात अभिजीतची टास्क खेळताना असलेली चिकाटी आणि मेहनत ही कौतुकास्पद होती.