By  
on  

ही मराठी गायिका सौंदर्यात अभिनेत्रींनाही टाकते मागे, पाहा सुंदर फोटो

आपल्या सुरेल आवाजासह सौंदर्यानेही घायाळ करणारी गायिका सावनी रविंत्र सोशल मिडीयावर सक्रिय असते. तिचे गाण्याचे व्हिडीओ, फोटो ती पोस्ट करत असते. सावनीने नुकतेच तिचे काही सुंदर फोटो पोस्ट केले आहेत. या फोटोच्या कॅप्शनमध्ये ती लिहीते की, "आ चल दिन को रोकें,धूप के पीछें दौड़ें, छाँव छुए ना...ओ साथी रे...दिन डूबे ना."

सावनीने आत्तापर्यंत विविध भाषीय प्रसिद्ध गाणी गायली आहेत. तिच्या गोड आवाजाने ती श्रोत्यांना मंत्रमुग्ध करते. सध्या लॉकडाउनमध्ये सावनी तिचा रियाजही करत आहे. शिवाय नुकतेच तिने तिच्या लहानपणीचे फोटो पोस्ट करत जुन्या आठवणींना उजाळा दिला आहे.

सावनी ही आत्तापर्यंत विविध सिंगींग रिएलिटी शोचा भाग झाली होती. सारेगमप या रिएलिटी शोमध्येही तिने तिचं गायनकौशल्य दाखवलं होतं.

सावनी ही डॉ. रविंद्र घांगुर्डे आणि डॉ. वंदना घांगुर्डे यांची  कन्या आहे. 

Author

Recommended

PeepingMoon Exclusive