By  
on  

यावेळेची संक्रांत ठरणार थरारक, रात्रीस खेळ चाले ही मालिका घाबरवण्यास सज्ज

मराठी रसिकांना केवळ भावनाप्रधान मालिकांचीच नाही तर थरारक मालिकांचीही आवड आहे. झी मराठीवर प्रसारित होत असलेल्या ‘रात्रीस खेळ चाले’ या मालिकेवरही भरभरुन प्रेम केलं.

रसिकांच्या याच प्रेमाला जागत या मालिकेचा दुसरा भाग मनोरंजनासाठी सज्ज झाला आहे. ही मालिका १४ जानेवारीपासून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. रात्री १०.३० वाजता ही मालिका प्रसारित होईल.

https://twitter.com/zeemarathi/status/1079399209412018176

कोकणातील पार्श्वभूमीवर आधारित असललेली ही भयकथा प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली होती. आता या मालिकेच्या दुस-या भागाचा प्रोमो रिलीज झाला आहे. या प्रोमोमध्ये कुलुपबंद दार कोणीतरी आतून धडकताना तसेच मालिकेतील पात्रांचे आवाजही दाखवले आहेत. या प्रोमोने उत्सुकता वाढवली आहे. आता ही मालिका रसिकांना घाबरवण्यात कितपत यशस्वी ठरते ते लवकरच कळेल.

Recommended

PeepingMoon Exclusive