By  
on  

शनाया फेम रसिकाने चाहत्यांसाठी गायलं हे इंग्रजी गाणं, लॉकडाउनमध्ये करतेय गायनाचा रियाज

अभिनेत्री रसिका सुनिल सध्या लॉकडाउनमध्ये घरीच आहे. यातच ती तिच्या गायन कलेचा छंद पूर्ण करतेय. सध्या रसिका तिच्या सोशल मिडीया अकाउंटवर  विविध व्हिडीओ पोस्ट करताना दिसत आहे. 

नुकताच रसिकाने आणखी एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. या व्हिडीओत रसिका प्रसिद्ध सिंगर एडेलचं 'ऑल आय आस्क' हे गाणं गात आहे. चाहत्यांनी रसिकाच्या या व्हिडीओवर कमेंट्स आणि लाईक्सचा वर्षाव केला आहे. 

 

रसिकाला लहानपणापासून गायनाची आवड आहे. तिने गायनाचं शिक्षणही घेतलं आहे. अभिनेत्री होण्याआधी रसिका लहानपणापासून गायनाचे कार्यक्रमही करत असे. 'माझ्या नवऱ्याची बायको' या मालिकेतून रसिका शनाया या भूमिकेमुळे प्रसिद्ध झाली होती. 

Author

Recommended

PeepingMoon Exclusive