By  
on  

ही अभिनेत्री प्रवास करतेय मिस, सध्या वर्च्युअल ट्रॅव्हलने करतेय समाधान

सध्या लॉकडाउनमुळे अनावश्यक घराबाहेर पडता येत नाहीय. त्यामुळे घराबाहेर पडण्याची इच्छा दाबून ठेवावी लागतेय. त्यातच ज्यांना प्रवासाची प्रचंड आवड आहे ते मात्र या गोष्टी मिस करत आहेत. 
अभिनेत्री मधुरा देशपांडेलाही प्रवासाची प्रचंड आवड आहे. मात्र लॉकडाउनमुळे सध्या प्रवास करणं शक्य नसल्याने ती करत आहे वर्च्युअल ट्रॅव्हलिंग. तिच्या प्रवासाच्या जुन्या आठवणींना ती उजाळा देत आहे. मधुराने तिचे काही जुने ट्रॅव्हलिंग फोटो पोस्ट केले आहेत. लंडन आणि स्कॉटलँडच्या ट्रीपच्या आठवणी तिने पोस्ट केल्या आहेत. या पोस्टमध्ये ती लिहीते की, “वर्च्युअल ट्रॅव्हल, तुम्ही पण तुमच्या ट्रीपचे फोटो पाहत आहात का ? आणि वर्च्युअल ट्रॅव्हल करत आहात का ? 2018  चा लंडन आणि स्कॉटलँड ट्रीपचा थ्रोबॅक.”

सध्या कोरोनाग्रस्त परिस्थिती आणि लॉकडाउनमुळे सगळं वर्च्युअल झालं आहे. सध्या भेटीही वर्च्युअल भेटीही होत असतात. मात्र लॉकडाउननंतर आणि काही कालावधीने हे सगळं पुर्वपदावर येईल तेव्हा मधुरा तिच्या ट्रॅव्हल स्टोरीज शेयर करेल ते पाहणं रंजक ठरेल. 

Author

Recommended

PeepingMoon Exclusive