By  
on  

अभिनेता अक्षय केळकरची स्वातंत्र्यवीर सावरकर यांना मानवंदना, काढलं इतकं सुंदर चित्र

आज स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांची १३७ वी जयंती. आणि याच निमित्ताने त्यांना मानवंदना म्हणून अभिनेता अक्षय केळकरने चक्क त्यांचं चित्र काढलं आहे. हे सुंदर चित्र पाहून अक्षयच्या कलेचं कौतुक होत आहे.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

Something we need the most in this tough time.... Strength and confidence! . . अनादि मी अनंत मी अवध्य मी भला | मारिल रिपु जगति असा कवण जन्मला ||ध्रु|| I have no beginning, no end. I cannot be killed. That enemy who would kill me is not yet born अट्टहास करित जाई धर्मधारणी मृत्युसीच गाठ घालू मी घुसे रणी I shall enter the war field with a mighty laughter. I shall enter the war field to fight the death itself. अग्नि जाळी मजसी ना खड्ग छेदितो भिउनी मला भ्याड मृत्यु पळत सुटतो The fire cannot burn me, the sword cannot cut me. The coward death runs away at my sight. खुळा रिपु तया स्वये मृत्युच्याच भीतीने भिववु मजसी ये ||१|| And this foolish enemy is trying to scare me by the fear of death !! - Vi. Da. Sawarkar title- swatantryaveer savarkar medium- watercolour on paper video editing-krunal rane @krunal_rane song credit- @sachettandonofficial @paramparathakurofficial

A post shared by Akshay Kelkar (@akshaykelkar) on

या पोस्टमध्ये तो म्हणतो की, “सध्या या कठीण समयी या गोष्टीची आपल्याला गरज आहे.. सामर्थ्य आणि आत्मविश्वास.”
या सोबतच त्याने या पोस्टमध्ये सावरकरांची ‘आत्मबल’ ही कविताही लिहीली आहे. अक्षयने हे चित्र काढत असतानाचा व्हिडीओही तयार केला आहे. त्यांच्या जयंती निमित्ताने त्यांचे विचार आणि त्यांचं हे सुंदर चित्र अशी अनोखी मानवंदना त्याने दिली आहे.
अक्षय हा अभिनेता असून त्याला चित्रकलेची आवड आहे. सध्या लॉकडाउनमध्ये तो विविध सुंदर चित्रे काढून त्याच्या सोशल मिडीया अकाउंटवर पोस्ट करत आहे.
 

Author

Recommended

PeepingMoon Exclusive