सध्या देशभरात कोरोनाचा सुळसुळाट सुरु आहेत. सध्याच्या लॉकडाउन परिस्थितीमध्ये विविध क्षेत्राचं काम बंद आहे. यात मनोरंजन विश्वाचही काम ठप्प झालं आहे. मात्र घरात बसलेली कलाकार मंडळी त्यांचे शूटिंगचे दिवस मिस करत आहेत. याच पार्श्वभूमिवर लेखक जयंत पवार यांनी एक व्हिडीओ तयार केला आहे. जयंत पवार यांचीच संकल्पना आणि लेखन असलेला हा व्हिडीओ आहे. या व्हिडीओमध्ये काही मराठी कलाकार हे, “पुन्हा सगळं नीट होईल.. पुन्हा शुटिंग सुरु होईल” असं म्हणत सकारात्मकतचे संदेश यातून देत आहेत.
सध्याच्या परिस्थितीत लॉकडाउनमुळे या क्षेत्रातील हातावर पोट असलेल्या मनोरंजन विश्वातील कर्मचाऱ्यांनाही मोठ्या अडचणींना सामोरं जावं लागत आहे. मात्र त्यांना आणि या संपूर्ण कलाविश्वाला धीर देण्याचा प्रयत्न हा व्हिडीओ करतोय. या व्हिडीओत पुष्कर श्रोत्री, प्रसाद ओक, अतुल परचुरे, सुप्रिया पाठारे, वंदना गुप्ते, विद्याधर पाठारे, सचिन गोस्वामी हे आणि इतर कलाकार दिसत आहेत. या व्हिडीओच्या पोस्टमध्ये लिहीलेल्या कॅप्शनमधली ही जयंत पवार यांनी लिहीली शेवटची ओळ अशी आहे की, “याच क्षेत्रातल्या लोकांनी आपल्या सहकार्यांना मदत करण्याचं पुण्यकर्म केलं.. मानसिक धीर दिला... किती ही मोठं संकट असू दे धीरानं उभी राहणारी ही इंडस्ट्री थोडी का होईना पण खचली हे मात्र नक्की... पण Don't worry खेळियांनो पुन्हा सगळं नीट होईल पुन्हा शूटिंग सुरू होईल.”