झी स्टुडिओज दरवेळी प्रेक्षकांसाठी काहीतरी नवीन करण्याच्या प्रयत्नात असते. त्याचाच परिपाक म्हणून आतापर्यंत अनेक उत्तमोत्तम सिनेमांचा आस्वाद प्रेक्षकांनी घेतला आहे.
झी स्टुडिओज आता आणखी एका नवीन सिनेमाचं पोस्टर रिलीज केलं आहे. विशेष म्हणजे हे पोस्टर स्त्री शक्तीला समर्पित आहे. हे पोस्टर आहे डॉ. आनंदीबाई जोशी यांचं.
झी स्टुडिओज चा ‘आनंदी गोपाळ’ हा आगामी सिनेमा भारतातील पहिला महिला डॉक्टर आनंदीबाई जोशी यांच्या जीवनावर आधारित आहे.
[video width="640" height="800" mp4="https://marathi.peepingmoon.com/wp-content/uploads/2019/01/zeetalkies_50120594_2041758609217006_271896168848424960_n.mp4"][/video]
आनंदीबाई जोशी यांनी परदेशात जाऊन वैद्यकिय शिक्षण घेतलं होतं. पण क्षयाने अकाली मृत्यू झाल्याने त्या वैद्यकिय सेवा देऊ शकल्या नव्हत्या. पण अत्यंत प्रतिकुल परिस्थितीत, जनक्षोभाची पर्वा न करता परदेशात जाऊन शिक्षण घेऊन पदवी मिळवणं हे कामही अत्यंत कठीण होतं. पण जिद्दी आनंदीबाईंनी ते अत्यंत धीराने पार पाडलं. आनंदीबाईंचा संघर्ष झी स्टुडिओने पडद्यावर दाखवण्याचा विडा उचलला होता. समीर विद्वांस यांनी या सिनेमाचं दिग्दर्शन केलं आहे. हा सिनेमा १५ फेब्रुवारीला प्रदर्शित होत आहे.