लॉकडाउनच्या काळात घरात बसून विविध गोष्टी सुरु आहेत. यातच स्वयंपाकर घरातील महिला मंडळ घरात विविध चविष्ट आणि रुचकर पदार्थ बनवण्यात व्यस्त आहेत. घऱात सगळी मंडळी इतके दिवस एकत्र असताना घरातील होम मिनिस्टर स्वयंपाक घरात विवित पदार्थांचा बेत आखताना दिसत आहेत.
अभिनेत्री अमृता खानविलकरच्या आईलाही कुकिंगची प्रचंड आवड आहे. त्यातच अमृता, तिचा पति हिमांशू हे सगळे घरात एकत्र असल्याने अमृताची आई घरात विविध पदार्थ बनवत आहेत.
नुकताच अमृताच्या घरी आईने मिसळ पावचा बेत केला. अमृताने या तर्रीबाज ठसकेदार मिसळीचे फोटो तिच्या सोशल मिडीयावर पोस्ट केले आहेत. आईने बनवलेली मिसळ पाहून अमृता प्रचंड आनंदी झाली आहे. शिवाय एक व्हिडीओ पोस्ट करून तिनेही तयार केलेली मिसळ कशी मिक्स करुन खावी हेही ती सांगते.
अमृताने ही सगळी मिसळ फस्त केली असेल एवढं नक्की, शिवाय तिने आईसोबतचा फोटो पोस्ट करून तिला मिसळ पाव प्रचंड आवडत असल्याचही ती सांगते.