By  
on  

लॉकडाउन वाढल्याची बातमी कळताच या अभिनेत्रीने केली ही गोष्ट

देशभरात लॉकडाउन 5ची घोषणा करण्यात आली आहे. येत्या 30 जूनपर्यंत हे लॉकडाउन विविध टप्प्यांसह असणार आहे. मात्र ही बातमी कळताच अभिनेत्री धनश्री कडगावकरने सोशल मिडीयावर एक पोस्ट केली आहे.
‘तुझ्यात जीव रंगला’ या प्रसिद्ध मालिकेत नंदिता वहिनी म्हणून प्रसिध्द असलेल्या धनश्री कडगावकर ही सध्या घरात कुकिंगचा छंद जोपासत आहे. नुकताच तिने केकही बेक केल आहे. आणि तेवढ्यातच लॉकडाउनचा कालावधी वाढण्याची बातमी आली.

 

मग काय धनश्री थेट सोशल मिडीयावर पोस्ट करून लॉकडाउनचा कालावधी वाढल्याने केक बनवला असल्याचे फोटो पोस्ट केले. धनश्रीने तिचे या केक सोबतचे फोटो पोस्ट केले आहे. या पोस्टमध्ये धनश्री लिहीते की, “ कैसे हुआ...कैसे हुआ..इतना जरुरी कैसे हुआ.... मी गिल्टी नाही, लॉकडाउन वाढल्याने मी हे केलय.”
 

Author

Recommended

PeepingMoon Exclusive