जून महिन्याच्या पहिल्याच तारखेला महाराष्ट्रातील काही ठिकाणी मॉन्सून म्हणजेच पावसाला सुरुवात झाली आहे. या पहिल्या सरींचा आनंद कित्येक जण लुटत आहेत. लॉकडाउनमुळे घरातच असलेली मंडळी घराच्या खिडक्यांमधून आणि बाल्कनीतून या रिम झिम सरींचा आनंद लुटत आहेत.
'जिव झाला येडा पिसा' या मालिकेत सिध्दीची भूमिका साकारणारी विदुला चौगुलेही या मॉन्सूनच्या पहिल्या दिवसाचा आनंद लुटत आहे. लॉकडाउनमुळे विदुला सुध्दा तिच्या घरीच आहे. मात्र या रिम झिम कोसळणाऱ्या सरी पाहून विदुलाला या पावसात भिजण्याचा मोह आवरला नाही. मग ती या पावसात चिंब भिजली आणि केला हा व्हिडीओ. विदुलाने तिचा पावसात भिजतानाचा व्हिडीओ शेयर केला आहे. या व्हिडीओला तिने ‘रिम झिम गिरे सावन..’ हे सुंदर आणि या ऋतूला साजेसं गाणं लावलं आहे. या पोस्टमध्ये ती लिहीते की, “मौसम इस कदर खुमारी मे है ...”