चला हवा येऊ द्या हा महाराष्ट्राचा लाडका कार्यक्रम. कधी एकदा तो पुन्हा सुरु होतोय व आपण सर्व त्या हास्याच्या लाटेवर स्वार होतोय असं प्रत्येकाला झालं आहे. आजूबाजूच्या नकारात्मक वातावणात टेन्शन विसरायला लावणारा आणि हसताय ना हसायलाच पाहिजे...हा प्रेमळ आपुलकीचा प्रश्न विचारणा-या निलेश साबळेसह कुशल बद्रिके, श्रेया बुगडे, सागर कारंडे, भाऊ कदम, भारत गणेशपुरे आदी सर्वांचीच महाराष्ट्र वाट पाहतोय.
करोना संकटामुळे जवळपास दोन महिने मालिका, सिनेमे आणि वेबसिरीज या सर्वांचंच शूटींग ठप्प होतं, पण नुकतंच पाचव्या लॉकडाऊनची घोषणा झाल्यानंतर मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी यात थोडी शिथिलता आणत काही अंशी योग्य ते सोशल डिस्टन्सिगचे नियम पाळत व योग्य ती खबरदारी घेत शूटींगला सुरवात करण्याचे संकेत दिले. यामुळे संपूर्ण सिनेसृष्टीला हायसे वाटले व प्रत्येकाने या निर्णयाचं स्वागत करत आनंद व्यक्त केला.
विनोदवीर अभिनेता कुशल बद्रिकेने मुख्यमंत्र्याच्या या निर्णयानंतर एक खास पोस्ट सोशल मिडीयाच्या माध्यमातून केली. तो म्हणतो,Shooting सुरू होणार म्हंटल्यावर माझ्या डोळ्यांसमोर उभी राहीलेली पहिली दोस्त, श्रेया बुगडे आणी कमाल म्हणजे phone check केला तर तिचाच message आलेला. ते TELEPATHY का काय म्हनतात ना, त्ये लै STRONG राव आमच्यात.