By  
on  

Video : सुपरवुमन शेवंताचा हा जबरदस्त स्वॅग पाहिलात का?

शेवंता फेम अभिनेत्री अपूर्वा नेमळेकर सोशल मिडीयावर बरीच सक्रीय असते. सतत लॉकडाऊनमधले तिचे अपडेट्स ती फोटो व व्हिडीओच्या माध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात असते. आता नुकतंच मुख्यमंत्र्यांनी शूटींग सुरु करण्यास सशर्त परवानगी दिली , त्यासोबतच त्यांचं एक वाक्य खुप अधोरेखित करण्यासारखं होतं ते म्हणजे करोनासोबत जगायला शिका. 

बॉस लेडी शेवंतासुध्दा बहुधा या व्हिडीओतून चाहत्यांना हेच सांग इच्छिते. ब्लॅक वेस्टर्न आऊटफिटमध्ये तयार होऊन निघालेली शेवंता, काहीतरी विसरल्याने पुन्हा मागे वळाली....आणि पाहतो तो काय मास्क चढवून ती बाहेर जायला पुन्हा सज्ज झाली. 

अपूर्वाचा हा व्हिडीओ करोना संकटाच्या पार्श्वभूमीवर  खुपच बोलका ठरतोय.मुख्यमंत्र्यांच्या सूचना पाळण्याचं एक प्रकारचं आवाहनच तिने केलं आहे. तरच आपण या संकटातून लवक सुटू. 
 

 

  

करोना संकटामुळे जवळपास दोन महिने मालिका, सिनेमे आणि वेबसिरीज या सर्वांचंच शूटींग ठप्प होतं, पण नुकतंच पाचव्या लॉकडाऊनची घोषणा झाल्यानंतर मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी यात थोडी शिथिलता आणत काही अंशी योग्य ते सोशल डिस्टन्सिगचे नियम पाळत व योग्य ती खबरदारी घेत शूटींगला सुरवात करण्याचे संकेत दिले. यामुळे संपूर्ण सिनेसृष्टीला हायसे वाटले व प्रत्येकाने या निर्णयाचं स्वागत करत आनंद व्यक्त केला

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive