जून महिन्याची सुरुवात पावसांच्या सरींनी झाली आहे. काही ठिकाणी पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या आहेत. यातच मनोरंजन विश्वातील काही कलाकारांनी या रिम झिम पावसाचा आनंद लुटला आहे.
अभिनेत्री प्रिया मराठेने नुकताच एक व्हिडीओ पोस्ट केलेला आहे. या व्हिडीओत पहिल्या पावसाचा आनंद तिच्या चेहऱ्यावर दिसतोय. या पोस्टमध्ये ती लिहीते की, “पाऊस… अगदी थोडा पडला पण खूप सही वाटलं..”
पहिल्या पावासाच्या बरसणाऱ्या सरींमध्ये भिजणं, ओल्या मातीचा तो गंध आणि सुंदर वातावरण या सगळ्या गोष्टी आता पावसाळ्यात अनुभवायला मिळणार आहेत. त्यातच लॉकडाउनमध्ये घरातच बसलेले कलाकार या ऋतूचा आनंद लुटताना दिसणार एवढं नक्की.