By  
on  

बाळासाहेबांच्या आवाजासाठी चेतन शशितल यांची निवड, रसिकांची इच्छा होणार का पूर्ण ?

बाळासाहेब ठाकरे म्हणजे मराठी अस्मितेचा मानबिंदू आहेत. बाळासाहेब ठाकरे यांची खास शैलीतील आणि खर्जातील भाषणं ऐकण्यासाठी शिवाजीपार्कात जमलेली गर्दी प्रत्येक मराठी माणसाची बाळासाहेबांशी असलेलं नातंच एकप्रकारे स्पष्ट करते.
असाच काहीसा अनुभव ठाकरे सिनेमाच्या निमित्ताने आला. बाळासाहेबांचा जीवपट उलगडणारा हा सिनेमा येत्या 25 जानेवारीला प्रदर्शित होत आहे. या सिनेमात नवाजुद्दीन सिद्दीकी हा बाळासाहेबांची व्यक्तिरेखा साकारत आहे.
ठाकरे या हिंदी सिनेमात बाळासाहेबांच्या व्यक्तिरेखेसाठी नवाजने आवाज दिला आहे. पण मराठी भाषेतील सिनेमासाठी मात्र सचिन खेडेकर यांनी आवाज दिला होता. या सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित झाल्यानंतर रसिकांनी पसंती दर्शविली आहे. पण यातील बाळासाहेबांच्या आवाजाला मात्र आक्षेप घेण्यात आला.


अनेकांनी बाळासाहेबांच्या प्रतिमेला सचिन यांचा आवाज शोभत नसल्याचं सांगितलं होतं. बाळासाहेबांच्या व्यक्तिरेखेला आवाजही तितकाच दमदार आणि खर्जातील असावा अशी मागणी रसिकांकडून केली जात होती. त्यामुळेच निर्माता आणि दिग्दर्शकांनीही बाळासाहेबांना त्यांचाच आवाज देण्याविषयी चर्चा सुरु केली होती.
बाळासाहेबांचा आवाज बनण्यासाठी चेतन शशितल यांच्या नावाचा विचार केल्या जाण्याच्या बातम्यादेखील समोर येत होत्या. पण अजूनही निर्मात्यांकडून कोणाचंही नाव समोर आल्याचं दिसून नाही.
चेतन शशितल यांनी यापूर्वी ‘बाळकडू’ सिनेमातही बाळासाहेबांचा हुबेहुब आवाज काढला होता. त्यावेळी त्यांच्या या कलेचं सर्वांकडून कौतुक झालं होतं. त्यामुळे मराठी ‘ठाकरे’ सिनेमासाठीही चेतन यांचा आवाज वापरला जाण्याची शक्यता असल्याचं सुत्रांकडून स्पष्ट झालं आहे.

Recommended

PeepingMoon Exclusive