By  
on  

आईवेडी अमृता आईच्या वाढदिवशी झाली भावूक, पोस्टमध्ये म्हणते...

मराठीतील हॉट आणि ग्लॅमरस अभिनेत्री अमृता खानविलकरचा आईवर किती जीव आहे, हे तुम्हाला वेगळं सागायला नको. अम्मूची मम्मा ही सतत तिच्यासोबत सावलीसारखी  असते, शूटींग असो किंवा एखादा इव्हेंट मम्मा आणि अम्मू ही जोडी ठरलेली असते. दोघींचं ट्युनिंगसुध्दा असल्याचं नेहमीच पाहायला मिळालं आहे. 

अमृताच्या सोशल मिडीयावर तर तिचे आणि आईचे अनेक धम्माल किस्से, प्रवासातले व्हिडीओ, टिक-टॉक व्हिडीओ पाहायला मिळतात. त्यावरुन मायलेकींचं  घट्ट नातं पाहायला मिळतं. अमृता दोन बहिणींमध्ये धाकटी असल्याने आई तिचे  सर्व लाड पुरवते. आज आईच्या वाढदिवसानिमित्त अमृताने खुपच खास अशी भावूक पोस्ट करत तिला शुभेच्छा दिल्या आहेत.

अमृता पोस्टमध्ये म्हणते, आई तु माझं जग आहेस, तुझ्याशिवाय मी काहीच नाहीय. जीवनातले सर्व चढ-उतार आपण दोघींनी एकत्र अनुभवलेत. पण कटू अनुभवांची झळ तु माझ्यापर्यंत पोहचू दिली नाहीस. तु माझ्यावर करत असलेल्या निस्सीम प्रेमासाठी खुप खुप धन्यवाद. अशीच माझ्यासोबत नेहमी राहा बास, बाकी मला काहीच नको....एक आईवेडी मुलगी...तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive